गृह - पुस्तके - खंबीर पणे दृढ रहाणे

खंबीर पणे दृढ रहाणे
शिक्षक: जॉन बीविअर

प्रतिकाराचा तुमचा अनुभव. कठिण परीस्थीतिंना तोंड देणे काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही स्थिर होता, कंबर कसता आणि ह्या कठिण परीस्थीतीचा सामना करायला ह्या आशेने तयार होता की यशस्वी होऊनच बाहेर येणार. जीवंत रहाण्या साठी तुम्ही वाटेल ते करायला तयार असता.

पण ह्या परीस्थितीं मध्ये तुमचे जीवन बदलण्याची क्षमता असेल तर? ह्या परीस्थिती मुळे जर तुम्ही विश्वासाच्या व प्रौढतेच्या नविन पालळी वर जाणार असाल तर? त्या परीस्थितीतून केवळ बाहेर निधाण्या पेक्षा खंबीर होऊन पुढे जाणे ही तुमच्या जीवना साठी योजना असेल तर?

खंबीर पणे दृढ रहाणे ह्या पुस्तका द्वारे जॉन बीविअर ची तुमची क्षमता उघड करण्याच्या मार्गावर धेऊन जाण्याची इच्छा आहे. ते पवित्र शास्त्र व इतर विश्वासणाऱ्याच्या जीवन कथा स्मरण करतांना एक सामर्थी प्रणाली समोर ठेवतातः विश्वासात खंबीर असणारे हे स्त्री व पुरूष कठीण परीस्थितीतून बाहेर निधण्याचा प्रयत्न करत नसतात. ते शत्रुच्या डोळयात डोळे घालून त्याला हाणून पाडतात.

देवाचे वचन व प्रार्थनेच्या सामर्थ्या ने सज्ज होऊन तुम्ही परीक्षा, विरोध आणि तुमच्या जीवना विषयी देवाच्या योजनेचे सत्य समजू शकाल. देवाचे लेकरूं ह्या नात्याने कठिण परीस्थितीला आपले सामर्थ्य बनवून उत्तम रीतिने शेवट करण्याची क्षमता तुमच्या मध्ये आहे.

डाऊनलोड (~2.76 MB)

Share