सध्याची भाषा: mr मराठी

भाषा
Selected Language:

गृह - विषय

क्लाऊड लायब्ररी विषयी

ही सामूग्री प्रत्येक पाळक व आत्मिक पुढाऱ्यां पर्यंत ते कोणत्या ठिकाणी रहातात किंवा त्यांची आर्थिक स्थिती अडखळण न होऊ देता पोहचवणे हे मेसेंजर इंटरनॅशनल चे जागतिक उद्देश्य आहे. क्लाऊड लायब्ररी ह्याच कारणा मुळे निर्माण केल्या गेली आहे. ही जागतिक वितरणा साठी प्रमुख केन्द्र बनले आहे आणि इथुन सर्व भाषांतरीत सामूग्री मोफत डाऊनलोड केल्या जाऊ शकते.

ही सामूग्री प्रत्येक प्रमुख भाषां मध्ये उपलब्ध करणे व तेणे करून पृथ्वीवरील 98% जनसंख्ये पर्यंत ती पोचवणे हे आमचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्या साठी क्लाऊड लायब्ररी एक माध्यम आहे. का? तुम्ही विचाराल, कारण इथुन सर्व सामूग्री वेगाने दूर पर्यंत जाऊ शकते. तुम्हाला ह्या सामूग्री चा लाभ होऊन आनंद घेता येईल असा आमचा विश्वास आहे।

निर्माण कर्त्यां द्वारे

येशु ने आपल्याला केवळ सुवार्ता प्रसार करण्याची नाही तर शिष्य बनविण्याची देखील आज्ञा दिली आहे. हे संदेश तुम्हाला शिष्य होण्या साठी सहायक होतील. तुमच्या प्रशिक्षणात आम्ही निवेश करत आहोत कारण देवाच्या कृपेने तुमच्या भोवतालचे क्षेत्र प्रभावित करण्याच्या तुमच्या योग्यतेवर व तुम्हा स्वतःवर आमचा विश्वास आहे. देवाने तुम्हाला महानता दिली आहे, आणि तुम्हाला पूर्णपणे जाणण्याची त्याची इच्छा आहे. ह्या सामूग्री मुळे तुमचे देवा सोबतचे नाते किती घनिष्ट आहे हे समजण्यास सहाय्य होईल. ख्रिस्ता सोबत तुमच्या संबंधात वाढत जातांना तुम्ही त्याच्या वचनाच्या सामर्थ्याने परिवर्तित होऊन जाल.

देवाने तुम्हाला एका विशिष्ट उद्देश्याने बनवले आहे आणि तुमचे गुण व कौशल्य अनोखे आहे. देवाने तुम्हाला जे कांही दिले आहे त्याची पूर्णता तुम्ही शोधावी अशी प्रेरणा आम्ही तुम्हाला देतो. आणि हे शोधण्या मध्ये ही सामूग्री तुम्हाला सहायक व्हावी अशी आमची प्रार्थना आहे.

तुम्हावर आर्शीवाद असो. तुमचे,

जॉन आणि लीसा बीविअर

दृष्टांताला सहकार्य करा.

जीवन परीवर्तन करणारे हे साहीत्य संपूर्ण जगभर वितरीत व्हावे अशी तुमची हार्दीक इच्छा आहे काय? क्लाऊड लायब्ररी च्या ह्या कार्यात तुम्ही सक्रिय सहभागी व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर getinvolved@cloudlibrary.org. वर लिहा. तुमच्या प्रार्थना व सहकार्या बद्दल आम्ही आधीच तुमचे आभार मानतो.